16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा ; नागरिकांनी उपस्थित रहावे

0
8

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती , नाव वगळणी , तसेच नवीन नोंदणी इ . प्रक्रीया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरीता ( दि 16) नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणुक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे . या विशेष मोहिमे अतंर्गत मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती , नाव वगळणी , तसेच नवीन नोंदणी इ . प्रक्रीया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरीता दि . 16/11/2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करणेबाबत ग्राम विकास विभाग , महाराष्ट्र शासन , यांचेकडील शासन परिपत्रकान्वये आदेशीत केलेले आहे .

या अनुषंगाने दि 16/11/2021 रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे . सदर ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी / तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल .

यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे . गावातील सर्व नागरिकांना मतदार यादीमधील नोंदी तपासता / पाहता येईल . मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहीत अर्ज तेथेच ग्रामसभेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .

या अंतर्गत मयत मतदार , कायम स्थलांतरित मतदार , लग्न होवुन बाहेर गावी गेलेले महिला मतदार यांची वगळणी , लग्न होवुन आलेल्या महिला मतदार यांची नोंदणी , दिव्यांग मतदार यांची नावे चिन्हांकित करणे , ज्यांचे वय दि 01/01/2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांची नवीन मतदार नोंदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे . ग्रामसेवक किंवा संबंधीत गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांनी नागरिकांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करतील . याकामासाठी तलाठी हे सहकार्य करतील .

शक्य असल्यास , सदर ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी nvsp portal / voter helpline App वरुन कशी भरता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांनी माहिती देतील . नागरिकांना मतदार यादीबाबतचे कामकाज कसे चालते याची देखील माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांनी माहिती देणार आहेत .

नागरिकांना त्यांचे मतदार यादी भागाचे मतदार नोंदणी अधिकारी , मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांचे नाव , मोबाईल नंबर यांची माहिती उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी दि 16 नोव्हेंबरच्या विशेष ग्रामसभेत सहभागी व्हावे ,असे आवाहन तहसिलदार विजय सुर्यवंशी यांनी केले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here