14 वर्षाच्या चिमुकल्याने चक्क घातली लग्नाची मागणी पुढे जे घडले ते ऐकून बसेल धक्का!

0
40

The point now – Swati kadam

या प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली शाळेपासून 14 वर्षाच्या चिमुकल्या त्याच्या सोबत शिकत असलेल्या तेरा वर्षीय मुलीला चक्क घातली मागणे म्हणजे त्याने तिच्यासाठी स्टेटस टाकले की माझी बायको होशील का?

परंतु अशा प्रकारचा स्टेटस ठेवणे त्या चिमुकल्याला महागात पडले आणि तिच्या मुलीच्या आईने सरळ पोलीस स्टेशनला जाऊ त्या मुलाबद्दल तक्रारी दाखल केली हे प्रकरण पुण्यात घडले आहे. ज्याला शिक्षणाचे माहेर म्हणून ओळखले जाते पुण्यात असा प्रकार घडावा तेही येवडूश्या मुलांच्या बाबतीत याचा कोणी अंदाजही लावला नव्हता . या सर्व प्रकारामुळे त्या अल्पवयीन मुला विरुद्ध तक्रार दाखल झाला आहे.

आजकाल प्रत्येकाला सोशल मीडियाचा वेड लागलं तरुण असो किंवा वृद्ध सर्वांच्या कडे मोबाईल असतो पण सोशल मीडिया मुळे बऱ्याचदा गुन्हेगारी घडते आणि लहान लहान मुलं अशा वृत्तीकडे वळतात .कारण सोशल मीडिया वरती बराश्या जागेवर सेंसोर शिप असा काही प्रकार नसतो जे की मुलं बघतात तेच ते करण्यासाठी प्रभावीत होत असतात. समजा सोशल मीडियावरती एखादा कपल त्यांना दिसलं तर तेही त्यांच्यासारख्याच गोष्टी करायला बघतात आजकाल लहान मुलांच्या हाती मोबाईल आल्यामुळे ते त्यांच्या वयापेक्षा मोठे झाले आहेत. याचा बहुतेकदा दुष्परिणाम सुद्धा त्यांच्या आयुष्यावर होतो.

असेच एक प्रकरण पुण्यात घडले एका अल्पवयीन मुलाने त्याच्यासोबत शिकत असलेल्या 13 वर्षाच्या मुलीचा फोटो इंस्टाग्राम वर टाकला आणि लिहिलं की माझी बायको होशील का? हा फोटो स्टोरी इतकी वायरल झाली की हे त्या मुलीच्या आई पर्यंत पोहोचले आणि तिने लगेच पोलीस स्टेशनत झेप घेतली.

हा मुलगा तुझ्यासोबत शाळेत शिकत असून आणि वारंवार तिचा पाठलाग करत असे तिला धमकीही द्यायचा की माझ्यासोबत मैत्री कर नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल इथपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते त्या मुलीने काहीही उत्तर न दिल्यामुळे त्याने सोशल मीडिया वरती तिचा फोटो टाकून माझी बायको होशील का असे लिहिले आणि तो फोटो चक्क व्हायरल झाला.

या सर्व प्रकरणांतर्गत पुढच्या पिढीचे काय होईल याचे विचार करूनच अंगात हुडहुडी भरते .कारण लहान लहान मुलांच्या हातात जेव्हा स्मार्टफोन सोशल मीडिया अशा गोष्टी येतात तेव्हा त्या वयापेक्षा मोठ्या गोष्टी करू लागतात अशा लहान लहान तक्रारी मोठ्या गुणांमध्ये बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणून पालकांनी आपला पाल्याकडे अधिक लक्ष द्यावे ते कुठले सोशल मीडिया वापरतात कशावरती आहेत काय करताय त्या प्रत्येक गोष्टीकडे आपल्या पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवण्याची प्रचंड गरज आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here