खळबळजनक – अज्ञात नराधमाने शाळेतच 13 वर्षीय विद्यार्थिनीवर केला बलात्कार

0
32

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र राज्य बलात्काराच्या एकामागे एक घटनांनी पूर्णतः हादरले आहे. पुण्यात नुकतीच एका मुलीवर बाप, भाऊ यांनी बलात्कार केल्याची घटना ताजी असतांनाच, आता एका विद्यार्थिनीवर शाळेतच एका अज्ञात नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका नामांकित शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीला एका अज्ञाताने ओळख असल्याचा बहाणा करत बळजबरीने बाथरूम मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुलींच्या सुरक्षिततेबाबत नेहमीच अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवले जाते. शाळेत सुरक्षित वातावरण असते, या विचाराने पालकवर्ग देखील निवांत असतो. मात्र एका नामांकित शाळेतच नराधमाने मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात शिवजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. शाळेतच घडलेल्या या घटनेने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here