दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. राज्यात इयत्ता बारावी आणि दहावीचा निकाल जून महिन्यात जाहीर होणार आहे. जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे काही दिवस निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणीचं काम पूर्ण झालं असून निकाल तयार करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून बारावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होतील, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असं बोर्डानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हता. इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील अशी हमी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील दिलं होतं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम