100 टक्के वीजबिल भरून शेतकऱ्यांचे महावितरणला सहकार्य

0
61

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : वडाळा ग्रुप नंबर 11 वरील शेतकरी वर्गाने डिपी कट न करता थकबाकी भरून 100 टक्के वसुली करून महावितरणला सहकार्य केले आहे. यामुळे तालुक्यातील संपूर्ण वसुली करून देणारे शेतकरी म्हणून या शेतकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या वसुलीसाठी वरिष्ठ तंत्रज्ञ प्रविण पवार यांचे मोलाचे योगदान लाभले त्यांची सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही किमया घडवून आणली, तसेच वडाळा – कनकापुरचे प्रगतशील शेतकरी नितिन शिंदे प्रा.केदारे, महेंद्र शिंदे , गोरख सोनवणे, वाल्मिक केदारे तसेच संपूर्ण शेतकरी वर्ग यांचे योगदान लाभले असुन देवळा तालुक्यात 100% वसुली देणारा ट्रान्सफार्मर म्हणून ओळख निर्माण झाली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here