आता या प्रकरणाचा निकाल लागणार?

1
13

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ;

– 100 कोटी वसुली प्रकरण

– राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप

– गृहमंत्र्यांचा राजीनामा

– पोलीस अधिकारी अटकेत

– आरोप करणारे पोलीस आयुक्त फरार घोषित

– सर्वोच्च न्यायालयाचे अटकेपासून संरक्षण

– पोलीस आयुक्त संरक्षणानंतर चौकशीसाठी हजर

हा घटनाक्रम आहे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सुरू असलेल्या 100 कोटी (100 Crore) वसुली प्रकरणाचा.

महाराष्ट्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करण्यात आले.

याबाबत लेटर बॉंब फोडला तो मुंबई (Mumbai) चे पोलीस आयुक्त (Police Commissioner) परमबीर सिंह (Parambeer Sinh) यांनी. या प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात झाली. आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह मात्र गायब झाले.

परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फरार घोषित केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) अटकेपासून (Arrest) संरक्षण मिळाल्या नंतर आता परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत.

आता या प्रकरणाला अजून वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. यात अजून काय नवीन खुलासा होणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मात्र परमबीर सिंह यांनी माध्यमांशी (Media) बोलतांना, आपण आत्ता काहीही बोलणार नसून, जे काही आहे ते थेट न्यायालयात बोलू असे स्पष्ट केले.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप, परमबीर सिंह यांनी केले होते.

त्यानंतर देशमुख यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांची देखील चौकशी सुरू झाली.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) चे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र, आपणाला याबाबत वस्तुस्थिती ठाऊक आहे. आपण देशमुखांना झालेल्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू. हे वक्तव्य प्रकरणाबाबत अजून गूढ वाढवण्यासारखे झाले.

आता या प्रकरणातील मुख्य व्यक्ती असलेले, परमबीर सिंह हे स्वतः मुंबईत येऊन कांदिवली (Kandiwali) येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी माध्यमांशी (Media) बोलतांना, आपण याबाबत न्यायालायमध्येच (Court) आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे.

न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. आपण त्यासाठीच पूर्ण सहकार्य करणार असल्याचे परमबीर सिंह म्हणाले आहेत.

आता न्यायालयात परमबीर सिंह (Parambeer Sinh) काय बोलणार? याबाबत काय खुलासा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या या आरोपांबाबत आता काय खुलासा होतो? नक्की हे काय प्रकरण आहे? याचा खुलासा आता थेट न्यायालयातच होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here