Bhandara : नागरिकांना वीज वितरण सुविधा देण्याचे केंद्र म्हणजे विज वितरण कार्यालय. विजे संदर्भातील विविध सोयी सुविधांसह तक्रार निवारण आणि मार्गदर्शन मिळण्याचे ठिकाण, मात्र याच वीज वितरण कार्यालयात उंदरांनी नव्हे तर चक्क सापांनी ठाण मंडलंय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील ही घटना आहे.
तर झालं असं की भांडाऱ्याच्या लाखांदूर वीज वितरण कार्यालयात चक्क अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जवळपास १० साप आढळून आल्याची खळबळजनक घटना महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कक्षात उघडकीस आली आहे. कार्यालयात साप असल्याच लक्षात येताच अधिकाऱ्यांनी सर्पमित्रांना पाचारण केल. मग सर्पमित्रांनी शोध मोहीम राबवून कार्यालयातील फरशी फोडून जवळपास १० सापांच्या पिल्लांना जिवंत पकडले आहे.
काही दिवसांपूर्वी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठून आपले दैनंदिन कामकाज सुरू केले. यावेळी पहिल्याच प्रहरात कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला पाण्याच्या कॅन खाली एक साप आढळून आला. थोडा वेळ होत नाही तर कार्यालयात काम करीत बसलेल्या एका कर्मचाऱ्याला फरशीवरून पुन्हा एक साप जाताना दिसून आला. अन्य दुसऱ्या खोलीतील कर्मचाऱ्यांना देखील असे साप दिसून आले. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती जवळच्या सर्पमित्रांना दिली. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर येथील सर्पमित्र सुशील सिल व सहकारी मित्र पवन दिवठे यांनी तात्काळ लाखांदूर येथील वीज वितरण कार्यालय गाठीत सापांचा शोध सुरू केली.
दरम्यान सापांचा शोध सुरू केला असता अधिकारी कर्मचारी काम करीत असलेल्या खोल्यांमध्ये तब्बल १० सापांची पिल्ले आढळून आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने सापांना पकडून बॉटलमध्ये कैद केले. सर्पमित्राने चक्क अधिकारी कर्मचारी बसत असलेली खोलीचा भाग फोडून सापांचा शोध घेतला. या शोध मोहिमेत जास्तीत जास्त नाग सापाचे पिल्ले आढळून आले. यामुळे वीज वितरण कार्यालयात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम