Accident : भंडारा जिल्ह्यात असलेल्या रामटेक येथे देवदर्शन करून परतत असताना एका कुटुंबाला महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकने धडक दिली, यात 1 जणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहेत.
राज्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही, यात भंडारा जिल्ह्यातील अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परसराम लहानू भेंडारकर वय ७० असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमींमध्ये राजेश परसराम भेंडारकर वय 34 वर्षे, दुर्गा राजेश भेंडारकर वय 32 वर्षे, मेघा चद्रहास बोंदरे वय 31 वर्षे, परसराम लहानू भेंडारकर वय 70 वर्षे, सीताबाई परसराम भेंडारकर वय 64 वर्षे, हिमांशू राजेश भेंडारकर वय 8 महिने, उन्नती राजेश भेंडारकर वय 8 महिने, रा. वय 5 वर्षे, भार्गवी चद्रहास बोंदरे वय 08 वर्षे, भव्य चद्रहास बोंदरे वय 08 वर्षे हे सर्वजण सोनकापाळस गाव, तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहेत. ही घटना रामटेक भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३६ एच ८४०३ क्रमांकाच्या वाहनातून चालक राजेश भेंडारकर हे आपल्या कुटुंबियांसह रामटेक दर्शनासाठी निघाले होते, दर्शन करून आपल्या गावी परतत असताना रामटेक भंडारा येथील आरोळी खंडाळा गावाजवळ पिवळ्या रंगाचा ट्रक क्रमांक एमएच ४० सीडी 9802 ट्रक महामार्गावर कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर न देता महामार्गावर धोकादायक अवस्थेत उभा होता. यावेळी त्याठिकाणाहुन जात असलेल्या कार चालकाच्या हे लक्षात न आल्याने कार मागील बाजूने ट्रकवर आदळली, ही धडक इतकी जोरदार होती की, यात एमएच 36 एच 8403 ही कार पूर्णतः चक्काचूर झाली. या धडकेत गाडीतील सर्व प्रवासी जखमी झाले.
दरम्यान स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी परसराम भेंडारकर वय 70 यांचा यात मृत्यू झाला आहे. तर इतर 8 जणांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. आरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करत ट्रक क्रमांक एमएच 40 सीडी 9802 च्या चालकाविरुद्ध कलम 283,337,338,304 (अ) भादवी सह कलम 122/177 मोवोका नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम