९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला दमदार सुरुवात

0
67

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शहराच्या वेशीवर कुसुमाग्रज नगरीत (kusumagraj nagari) आजपासून सुरू होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (marathi sahitya sammelan) संमेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

भारतीय मौसम विभागाने उद्यापर्यंत पावसाचे आणि ढगाळ वातावरणाचे संकेत दिले आहे. डॉ. नारळीकर यांची प्रकृतीचा विचार करता त्यांना हेलिकॉप्टर किंवा विमानाने उपस्थित रहावे लागणार होते. मात्र ऐनवेळी असे वातावरण झाल्याने विमानाबाबतदेखील साशंकता व्यक्त केली जात आहे. करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट, ढगाळ वातावरणामुळे आरोग्याचा तक्रारी त्यातच डॉ. नारळीकर यांचे वाढते वय बघता ते ऑनलाइन उपस्थित राहतील अशी चर्चा संमेलननगरीत होत आहे. जरी डॉ. नारळीकर उपस्थित राहत नसले तरी त्यांनी लिहिलेले शुभेच्छा पत्र त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मंगला नारळीकर वाचून दाखवणार आहेत; यावेळी स्वतः डॉ. नारळीकर ऑनलाईन उपस्थित राहणार आहे, असे देखील समजते आहे.

सर्व निकष पूर्ण करूनदेखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय व्हावा यासाठी जनतेकडून पत्रे संकलित करून ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचिकेसाठी सुपूर्द केली जातील. या मोहिमेला आजपासून ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या उद्‌घाटनापासून सुरवात केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली.

देसाई यांनी गुरुवारी संमेलनस्‍थळी भेट देत विविध कामकाजाचा आढावा घेतला. स्‍वागताध्यक्ष छगन भुजबळ, समन्‍वयक समीर भुजबळ, ॲड. रवींद्र पगार, पंकज भुजबळ यांच्‍यासह संमेलनाचे पदाधिकारी या वेळी उपस्‍थित होते. श्री. देसाई यांनी अभिजात मराठीसाठीच्या विशेष दालनाला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला व नंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की यापूर्वी भाषा समितीच्‍या तज्‍ज्ञांनी सर्व पुरावे पडताळले असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी पात्र असल्‍याचा निर्वाळा दिलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आतापर्यंत सहा भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला असून, सर्व निकष पूर्ण करूनही मराठीला हा दर्जा का बहाल केला जात नाही, हे अनाकलनीय आहे. नाशिकला होत असलेल्‍या या संमेलनानिमित्त जनतेतून पत्रे संकलित करून ती राष्ट्रपतींना सुपूर्द केली जातील.

संमेलनानिमित्त अभिजात मराठी दालन उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे, याची माहिती या दालनातून दिली जाणार आहे. साहित्‍य संमेलनातील सहभागींनी दालनास भेट देताना मराठी भाषेच्‍या न्‍याय्य हक्‍कासाठी उभे राहावे. संमेलन कालावधीत सतरा मिनिटे कालावधीचे माहितीपत्र या दालनात दाखविले जाईल. दालनात मराठीच्‍या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्‍या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, १९ व्‍या शतकातील मराठी, आधुनिक मराठी अशा दोन हजार वर्षांपूर्वीच्‍या मराठी भाषेच्या प्रवासाची माहिती देणाऱ्या विविध पुराव्‍यांची मांडणी केली आहे. संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ, निवडक कथा आदींच्‍या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here