३५० वा राज्याभिषेक सोहळा भारतभर साजरा करणार – डॉ.संदीप महिंद यांची चांदवाडला घोषणा

0
36

नितीन फंगाळ
चांदवड प्रतिनिधी : डॉ.संदीप महिंद व शिवभक्तांचे चांदवड नगरीत स्वागत करण्यात आले. पानिपत गौरव गाथा मोहीम साजरी करून परतत असताना शिव मोहिमेचे मुख्य व्याख्याते डॉ.संदीप महिंद गुरुजी यांचे शहरात स्वागत करण्यात आले, यावेळी भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल यांची टीम व भारतीय छावा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन निकम सर यांच्या महासंघातर्फे चांदवड शहरातील नगर परिषद येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण करून जय जयकार करण्यात आला यावेळी डॉ.संदीप महिंद यांनी सचिन निकम सर व नितीन फंगाळ यांचा संस्कृत शब्दांमध्ये आशीर्वाद देत वाढदिवस देखील साजरा केला.

गुरुजींनी यावेळी बोलताना सांगितले की सन २०२४ काळी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे, यासाठी संपूर्ण भारत देशातून पायी किल्ले रायगड मोहीम राबविणार असून यासाठी संपूर्ण देशभरातून शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त गावा- गावात सोहळा साजरा करण्यात यावा यासाठी ही मोहीम राबवीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवाकार्याच्या कामात चांदवड करांनी सहभागी व्हावे तसेच सर्व भक्तांनी- मावळ्यांनी एकत्र येऊन यापुढे भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावेत प्रत्येकाने शिवरायांचा आदर्श घेत उपक्रम साजरे करावेत असे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी भूषण कासलीवाल यांची कार्यक्षम टीम ही नेहमी बरोबर राहील तसेच मी छावा संघटनेच्यावतीने सर्व काही असलेले कार्यक्रम हे मार्गी लावण्यात सक्षम असू असे सचिन निकम यांनी डॉक्टर संदीप महिंद यांना सांगितले.

यावेळी समवेत डॉ.संदिप महिंद गुरुजी, सोबत सधीर ईगवले,विलास ढोमसे,बापु शेलार,संजय बोळीज,संदिप बरशीले,निबाजी फरताळे, भगवान शिंदे,नारायण गुंजाळ,रामनाथ ढोमसे,दिपक देशमुख सर,रवी बिडवे,गोरख कोटमे,दत्तु नाईकवाडे,योगेश महाले, तसेच चांदवड येथील दत्तू काका राऊत, मुख्याधिकारी अभिजित कदम,सचिन निकम, दीपक हांडगे, गणेश पारवे,सचिन राऊत,कैलास गांगुर्डे,नितीन फंगाळ,मुकेश भिडे, प्रशांत कावळे,अमोल थोरे, शंकर ढोमशे,विकास शिंदे. तालुका राष्ट्रीय सेवा संघ प्रचारक आदी नागरिक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here