द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : शेजारी राहत असलेल्या किशोरवयीन मुलाने २३ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी १४ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज त्याला बालन्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
पीडित तरुणी तिच्या आई आणि मावशीसोबत राहते. दोघीही कामावर जात असल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारचा किशोरवयीन मुलगा घरात घुसला. त्याने १६ मे आणि १८ मे अशा दोन्ही दिवशी सतत तरुणीवर बलात्कार केला. तिची मावशी बुधवारी दुपारी घरी परत आली असता तरुणी अस्वस्थ आणि घाबरलेली दिसली. खोलीचा पडदा देखील व्यवस्थित लावल्याचे मावशीला आढळले. तरुणी दिव्यांग असल्याने ती पडदा व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे मावशी आणि आईने आजूबाजूला चौकशी केली असता शेजारच्या किशोरवयीन मुलाने तरुणीवर बलात्कार केल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर आई आणि मावशी दोघींनीही पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
पोलिसांनी चौकशी केली असता, १६ आणि १८ मे रोजी तरुणीचे कुटुंबीय घरी नसताना तिच्यावर दोन दिवस बलात्कार केल्याचे आरोपीने कबूल केले. त्यानंतर मुलाला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी बालन्यायालयासमोर हजर करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम