देशांमधील राजकीय क्षेत्रात तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे राज्यात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल दरात चढउतार होताना दिसते. देशात आज देखील इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
6 एप्रिलपर्यंत इंधनाच्या दरात सातत्याने वाढत होता. तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. गेल्या 20 दिवसांपासून इंधनाचा किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आता पेट्रोलचे दर 120.51 रुपयांवर पोहचले आहेत.गेल्या दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये डिझेलचे दर 104.77 रुपये आहेत . जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 106 डॉलरच्या आसपास आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांमध्ये देशातील किमती स्थिरावले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम