द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा (MLA) तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्य सरकारद्वारे (Government) राज्यपालांना १२ राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी लिस्ट (List) पाठवण्यात आली होती. मात्र त्यावर अद्याप राज्यपाल मनावर घेत नसल्याचं दिसून येतंय.
आता याच १२ आमदार नियुक्ती प्रश्नावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakare) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor) यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे उपमुख्यमंत्री आजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राजभवणावर पोहचले आहेत. राज्यपालांद्वारे १२ आमदार नियुक्ती वर अद्याप का काही पाऊल उचलले गेलेले नाही? हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या राज्यपाल भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
तर राज्यपालांमुळे राष्ट्राला आणि संविधानाला धोका असल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू (Minister Bachhu Kadu) यांनी केली आहे. राज्यपालांनी अद्याप १२ आमदार नियुक्तीवरून कोणतेही पाऊल न उचलल्याने, राष्ट्रपतींनी (President) यात लक्ष घालण्याची आणि राजभवनाची (Raj Bhavan) चौकशी करण्याची मागणी मंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यपालांचे वागणे हे नियमबाह्य आहे, त्यामुळे चौकशी व्हायलाच हवी असे मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभेत गदारोळावरून भाजपच्या (BJP) १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर चर्चा झडली होती. तुम्ही आमचे १२ आमदार नियुक्ती ताटकळत ठेवली, आता तुमचेही १२ आमदार बाहेर असतील. अशा स्वरूपाचे मिम्स (MIMS) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय न घेऊन, राज्य सरकारला ताटकळत ठेवल्याने राज्यपालांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याबाबत कोर्टात (Court) याचिका दाखल केल्यानंतर, राज्यपाल कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही म्हणून कोर्टाने खडसावले होते.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल भेटी नंतर तरी हा १२ आमदारांचा तिढा सुटतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम