११ वी ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात ; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

0
13

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : अकरावी साठी  प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० मे पासून सुरू होणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि नाशिक या शहरातील अकरावीकरिता प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी अर्ज भरावा लागणार आहे. या नोंदणीचा प्रक्रियेचा पहिला टप्पा ३० मे पासून सुरू होणार आहे.

३० मे पासून अकरावी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया सुरू करता येणार आहे. तर दहावीच्या निकालानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण करता येणार आहे. १० वी च्या निकालाची वाट पाहणाऱ्या  तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अकरावीला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनकरिता ही प्रक्रिया महत्वाची असणार आहे.

महाराष्ट्रामधील काही निवडक शहरांमध्ये ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्या पसंतीच्या महाविद्यालयांना प्राधान्य देत एक यादी द्यावी लागणार आहे. यानुसार कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त १० महाविद्यालयाची नावे देऊ शकणार आहेत.

विद्यार्थ्यांना निकाला प्रमाणे महाविद्यालयात मेरिट लिस्टनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हे अर्ज भरत असताना विद्यार्थ्यांना काही अडचण येत असल्यास हेल्प लाइन नंबरवर कॉल करून आपली अडचण सोडवता येईल. विद्यार्थी 11thadmission.org.in या वेबसाईटवर लॉग इन करून पसंतीचे महाविद्यालय निवडू शकतात.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here