होळी – एकाचा उत्साह दुसऱ्याला नडला; फुग्याच्या कारणाने होळीच्या दिवशीच एकाचा दुर्दैवी मृत्यू

0
57

द पॉईंट नाऊ ब्युरो : होळीच्या दिवशी एक वाईट घटना घडली आहे. विरार येथे रंगाचा फुगा मारल्याने एका सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रकमधून होळी नेट असतांना एकाने मोटारसायकल स्वाराला फुगा मारला. त्यात या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून त्याचा सायकलस्वारास धडक दिल्याने, रामचंद्र पटेल या सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

होळी म्हटली की सर्वांमध्ये एकच उत्साह संचारतो. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच कुठल्याही बंधनांविना होळी साजरी होते आहे. त्यामुळे सगळीकडेच मोठा उत्साह आहे. मात्र या उत्साहाच्या भरात एकामुळे दुसऱ्याला नाहक आपला जीव गमवावा लागला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here