हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकांचा परवानाच होणार आता रद्द

0
10

द पॉईंट नाऊ ब्युरो : वाहतूक नियमांना धाब्यावर बसवून चालणाऱ्या वाहन धारकांना आता पोलिसांनी चांगलीच चपराक दिली आहे. आता जेही दुचाकीधारक विनाहेल्मेट वाहन चालवताना दिसतील, अशांचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय मुंबईत घेण्यात आला आहे. आता मुंबईत वाहनधारकांना याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आपला परवाना गमावून बसावा लागेल.

वाहतूक नियम हे नागरिकांच्या जिवाच्या काळजीसाठीच असतात. वाहतूक पोलीस नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी नेहमी सूचना करतात. वेगवेगळे उपक्रम राबवतात. मात्र तरी देखील वाहनधारक जुमानायला तयार होत नाहीत.

आता मुंबई पोलिसांनी अशा न जुमाणणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच चपराक दिली आहे. सध्या पोलिसांना आता वाहन थांबवून दंड वसूल करण्याची देखील आवश्यकता नाही. ठिकठिकाणी लावलेले कॅमेरे नियम मोडणाऱ्या वाहनांचे नंबर नोंद करतात.  संबंधित वाहनाला इ-चलनाद्वारे दंड आकारला जातो. तसेच आता हेल्मेट नसलेल्या वाहन धारकाच्या वाहनाचा तपशील प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवला जाणार आहे. आणि त्यावरच संबंधित वाहन धारकाकडून दंड तर वसूल केला जाईलच, पण त्याचबरोबर त्या वाहन धारकाचा परवाना देखील रद्द केला जाणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यामुळे आता दुचाकी चालकांना नियम मोडणे म्हणजे आपला परवानाच रद्द करून घेणे, असे होईल. म्हणून वाहन धारकांना आता नियम पाळूनच वाहन चालवावे लागेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here