द पॉईंट नाऊ ब्युरो : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाने अखेर निर्णय दिला आहे. हिजाब परिधान करून येणाऱ्या 6 मुलींनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
कर्नाटक येथे एका महाविद्यालयात मुस्लिम मुली हिजाब घालून आल्यानंतर, काही हिंदू मुले-मुली महाविद्यालयात भगवे वस्त्र परिधान करून आले होते. यामुळे इथला वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला होता. या कारणास्तव येथे शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती.
तर दुसरीकडे या वादावर मोठे राजकारण करण्याचा देखील प्रयत्न केला गेला. दरम्यान, या प्रकरणातील हिजाब घालणाऱ्या 6 मुलींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. महाविद्यालय, शाळा येथे विशिष्ट प्रकारचा गणवेश दिलेला असतो. तोच प्रत्येकाने परिधान करावा. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अनिवार्य भाग नाही. शाळेत शाळेचाच गणवेश हवा. असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम