हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचा फडशा ; नागरिकांमध्ये भीती

0
35

देवळा प्रतिनिधी : देवळा मालेगांव रस्त्यावरील दहिवड मेशी शिवारात बुधवारी( दि ५) रोजी पहाटेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने गाईचा फडशा पडल्याने पुशुपालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

देवळा मालेगाव रोडवरील मेशी व दहिवड परिसरातील शेतकरी निंबा केदा पगार यांच्या अंदाजे 3 वर्षे वयाच्या गायीवर बुधवारी पहाटेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने हल्ला करून सदरील गाईचा फडशा पाडला आहे . या परिसरात अशा प्रकारच्या घटना सतत घडत असल्याने पशु पालकांनी चिंता व्यक्त केली आहे . वन विभागाने याची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी ,अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here