‘हिंदूस्तानी भाऊला अटक , ‘टपा टप’ कारवाईने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस !

0
31

द पॉईंट नाऊ : दहावी बारावी विद्यार्थ्यांबद्दल उगाचच अफवा पसरवणे, विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी उकसवणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसाला मारहाण करणे, सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, अशाप्रकरचे आरोप हिंदुस्थानी भाऊ याच्यावर करण्यात आले आहेत. या सर्व आंदोलन प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हिंदूस्तानी भाऊला उच्चभ्रू या हॉटेलमधून अटक केली. तेथे दुसऱ्याच्या नावावर नोंदणी करण्यात आलेल्या खोलीत तो राहत होता.

अटक केल्यानंतर हिंदूस्तानी भाऊला वांद्रे येथील मोठय़ा बंदोबस्तापात न्यायालयात नेण्यात आले. ‘आरोपी सराईत असून यापूर्वीही त्याने शिवाजी पार्क येथे आंदोलन केले होते. त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी धारावी येथे आले, असे सरकारी वकील प्रसाद जोशी यांनी न्यायालयाला सांगितले.

हिंदूस्तानी भाऊनेही यावेळी स्वत:ची बाजू मांडली. त्या व्हिडिओद्वारे मी विद्यार्थाना बोलावले होते. पण विद्यार्थी नसलेले काही जण तेथे आले होते. माझ्यासोबत अटक करण्यात आलेली व्यक्ती (इकरार खान) विद्यार्थी नाही. मला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा नाही, असे त्याने यावेळी सांगितले. अटक करण्यात आलेल्या इकरार खानने मी गर्दी पाहण्यासाठी गेलो होतो, शेजारील व्यक्ती दगडफेक करीत होती, मात्र पोलिसांनी मला पकडले, असा जबाब दिला. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दोनही आरोपींना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here