हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक ; एकदंत इंग्लिश मिडीयम स्कूल,औंदाने येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
25

स्वप्निल अहिरे,
सटाणा प्रतिनिधी : सटाणा तालुक्यातील एकदंत इंग्लिश मीडियम स्कूल,औंदाने येथे सर्व धर्म समभाव अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराजांच्या मुख्य भूमिकेत इयत्ता ६ वी चा विद्यार्थी मोहिन खलील शेख व माँसाहेब जिजाऊ च्या भूमिकेत इयत्ता १ ली ची विद्यार्थीनी अनन्या पंकज पाटिल यांनी साकारली होती.

शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार पासुन अश्वावर विराजमान होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे लेझिम नृत्य पथकावर आगमन झाले. त्यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहून्यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृति पुतळा व प्रतिमेचे पूजन झाले. दीपप्रज्वलन करुन शिवरायांची आरती करण्यात आली नंतर विद्यार्थ्यानी आपआपले मनोगत व्यक्त केले.

भाषणे झाल्यावर शिवरायांच्या बालपनाच्या जीवनावर आधारित नृत्य सादरिकरण झाले व विविध प्रकारचे गाने, नृत्य , पोवाडे झाले याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम मुसळे सर, सचिव प्रतीक मुसळे, प्रमुख पाहुने म्हणून औंदानेचे सरपंच निकम मॅडम मुख्याध्यापिका मोतलिंग मॅडम ,उप-मुख्याध्यापक साळुंके सर तथा जयश्री पवार यांनी प्रस्तावना केली तर भाग्यश्री पाटिल मॅडम यांनी अभार प्रदर्शन केले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here