द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बालाकोट एअर स्ट्राइकचे हीरो आणि पाकिस्तानचा F-16 फाइटर जेट पाडणारे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना सोमवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीर चक्र देऊन सन्मानित केले. भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर हल्ला करण्यास आलेल्या पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाचं अत्याधुनिक F-16 फाइटर जेट ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी पाडले होते. F-16 फाइटर जेट जमीनदोस्त केल्यानंतर अभिनंदन यांचं विमानदेखील कोसळलं. त्यानंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले. मात्र सुदैवानं त्यांची सुटका झाली आणि ते सुखरुप मायदेशी परतले.
बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. सज्ज भारतीय हवाई दलाने त्याचा पाठलाग केला. विंग कमांडर अभिनंदन त्यावेळी मिग-21 उडवत होते. अदम्य शौर्य दाखवत विंग कमांडरने पाकिस्तानचे F-16 पाडले. त्यानंतर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या सीमा भागात कोसळले. यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने कैद केले होते. मात्र, भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने त्याला तब्बल 60 तासांनंतर सोडून दिले.
‘मी त्याचा पाठलाग करतो, तो माझा शिकार आहे’, विंग कमांडर अभिनंदन यांनी रेडिओद्वारे भारतीय आकाशाचे निरीक्षण करणार्या त्यांच्या साथीदारांना हा संदेश पाठवला. यासह, 86 सेकंदांचा क्लोज सामना सुरू झाला, ज्याला ‘डॉग फाईट’ म्हणून ओळखले जाते. त्यावेळी पाठलागाचा वेग हवेत दर चार सेकंदाला 1 किमी आणि एका तासात 900 किमी होता. पाठीमागच्या या खेळाने 26 हजार फूट उंचीला स्पर्श केला. शेवटी अभिनंदनने पाकिस्तानचे F-16 नष्ट करणारे क्षेपणास्त्र डागले.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत जात होते. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले. त्यात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांना पिटाळून लावलं. याच दरम्यान विंग कमांडर अभिनंदन (आता ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत) पाकिस्तानचं एफ-१६ विमान जमीनदोस्त केलं. त्यानंतर त्यांचंही विमान कोसळलं. ते पाकव्याप्त काश्मीरमधील काही स्थानिकांच्या तावडीत सापडले. सुदैवानं त्यांची काही तासांमध्ये सुटका झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम