द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यातील कनकापूर येथे नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन “हर गाव डिजिटल हर गाव इंटरनेट” सेवा या उद्देशाने साकार होत असलेली गाव तिथे ‘ओक्टिकल फायबर केबल’चे काम संपूर्ण देशा प्रमाणे नाशिक जिल्ह्यात ही पूर्ण झाले असून wifi chopal हे सर्व ग्रामपंचायत किंवा गावाच्या मध्यस्थानी गेल्या वर्षी बसवण्यात आल्याने सर्वत्र इंटरनेट सेवा चालू झाली आहे.
त्यालाच अनुसरून भारत सरकार ने ‘मार्गो नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई’ या कंपनीशी इंटरनेट सेवा देण्यासाठी करार केला आहे. कंपनीने सुरवातीच्या 2 ते 3 वर्षात महाराष्ट्रात फक्त 40 गावामध्ये शुगर बॉक्स बसवण्याचे लक्ष ठेवले आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुका येथील कनकापूर गावात जगदीश शिंदे व यशवंत देवरे गुरू कम्प्युटर देवळा यांनी कंपनीशी वारंवार संपर्क व पाठपुरावा करून कनकापूर येथे सदर sugar box setup बसवून सेवा चालू करून घेतली आहे.
या sugar box चा फायदा set up च्या wifi rang च्या 200मीटर च्या संपर्कात येणाऱ्या गावातील सर्व नागरिकांचा Android mobile tablet व Smart tv यांमध्ये sugar box aap डाउनलोड करून त्यात विविध भारतीय भाषांमधील चित्रपट, टीव्ही शो आणि बरेच काही मोफत शुगरबॉक्स वाय-फायशी कनेक्ट करून अॅपमधील अमर्यादित सामग्री डाउनलोड तसेच पाहू शकता तेही इंटरनेट deta नसतांना 5G speed मध्ये.
त्यासाठी कुठला ही Id पासवर्ड असणार नसून फक्त Sugar Box Aap Dawnload करायचे आहे, आणि अमर्याद सेवा Internet Deta विना मोफत वापरता येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम