स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्सवाला सुरवात

0
29

तुषार रौदळ
सटाणा प्रतिनिधी : येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात केंद्राच्या वतीने श्री दत्त जयंती नामसप्ताह सोहळयास मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या निमित्ताने केंद्रात विविध धार्मिक सुरू असल्याचे केंद्रप्रमुख किरण नांद्रे यांनी सांगितले. आयोजन करण्यात 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर या सप्ताह सोहळा संपन्न होत असल्याची माहिती केंद्रप्रमुख किरण नांद्रे यांनी दिली.

सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताह काळात अखंड नाम, जप, यज्ञ,श्री गुरू चरित्र पारायणाचा शुभारंभ रविवार रोजी शुभांरभ करण्यात आला. केंद्रात सुमारे 300 सेवेकरी गुरूचरित्र पारायण वाचनास बसलेले असुन महिला सेवेकर्‍यांचा मोठया प्रमाणात सहभाग आहे. या सप्ताह काळात गणेशयाग, मनोबोध याग, गिताई याग, चंडी याग, स्वामी याग , रूद्रयाग, मल्हारी संपन्न होऊन बली पुर्णाहुती होऊन शनिवार दि. 18 रोजी श्रीदत्त जन्मोउत्सव कार्यक्रम दुपारी 12.39 वाजता साजरा होत असून 19 डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पुजन देवतः विसर्जन अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह सांगता होणार आहे.

सप्ताह सोहळयात पौराहित्य अशोक चव्हाण, मुकेश जाधव, दत्ता शेवाळे, संकेत खरोटे, मनोज अमृतकार, विनायक सोनवणे हे करीत असून सामुदायिक वाचन उषा अमृतकार, सुरेखा खैरणार, मनिषा पवार करीत आहे. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण नांद्रे, अनिल सोनवणे, बी.डी.अहीरे, बापू जगताप, रणजित पवार, उत्तम सोनवणे, राकेश येवला, प्रविण जाधव, आशिष वाघ, अभिषेक खरोटे, हेमंत देवरे, हेमंत सोनवणे, यश पवार, आयुष येवला,रामचंद्र सोनवणे, मयुर पवार, रमेश कुटे, मनिषा अहिरे, शंकुतला शिंदे, सुरेखा खरोटे, शोभा पाटील, सुवर्णा बागड, अलका बेडीस, छाया अहिरे आदीसह महिलाभगिनी प्रयत्नशील आहे.

शनिवार रोजी दुपारी 12.39 ला दत्त जन्मोत्सव साजरा होत असून रविवार दि.19 रोजी पुरणाच्या दिव्यांची महाआरतीने सांगता होणार असल्याने भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रप्रमुख किरण नांद्रे यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here