स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात देवळा येथे कार्यकर्त्यांचा प्रवेश

0
45

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते मोनोज संसारे यांच्या आदेशान्वये देवळा येथे कार्यकर्ता पक्ष प्रवेश सोहळा व पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुकाध्यक्ष पदी नितीन अहिरे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नाशिक संपर्क प्रमुख भागवान गरुड, अरुण धिवर, जिल्हाध्यक्ष दिपक धिवर यांनी केली.

शनिवार ( दि. २५ ) रोजी देवळा विश्रामगृहावर आयोजित कार्यक्रमात देवळा तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव, महाराष्ट्र संघटक अरुण जाधव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तय्याब शेख, नाशिक महिला आघाडी नेत्या गडाधरा ताई, भागवान भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी तालुका कार्याध्यक्ष नितीन केदारे, संपर्क प्रमूख मुकेशभाऊ गरुड, उपाध्यक्ष संदीप जाधव, सागर गरुड, खजिनदार प्रकाश आहिरे, सचिव काळू गांगुर्डे, संघटक राहुल आहिरे, सिद्धार्थ आहिरे, समाधान केदारे, आनंद आहिरे, स्वप्नील जाधव, दीपक आहिरे, केशव बाबा, रवींद्र केदारे, आप्पा केदारे, विश्वास आहिरे, विकिराज आहिरे, आकाश आहिरे, रोहित जाधव, यश निरभवणे, गणेश बागुल, किरण आहिरे, सचिन आहिरे, देविदास आहिरे, गणेश गरुड, राजू गरूड, गणेश आहिरे, राकेश पवार, मनोज केदारे, अविनाश केदारे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here