द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व प्रशासकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( दि.२६) रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी उपस्थितांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण करून देत प्रत्येक गावागावात त्यांचे यथोचित स्मारकं उभी करून त्यांना योग्य सन्मान दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी देश हितासाठी आपले योगदान द्यावे, या स्पर्धेच्या युगात टिकुन आपली जबाबदारी ओळखावी, यु पी एस सी आणि एम पी एस सी च्या माध्यमातून अधिकारी होऊन देश सेवेचा मार्ग पत्करावा असे आवाहन केले. याप्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभाग देवळा च्या वतीने ७५ प्रश्नांची प्रश्नमंजूषेचे ऑनलाईन स्वरूपात उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री सतीश बच्छाव पुढे म्हणाले की, देवळा महाविद्यालय ग्रामीण भागात असूनहीह एक उपक्रमशील महाविद्यालय आहे. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर यांनी घेतला.
संस्थेचे सचिव गंगाधर मामा शिरसाठ यांनी जेष्ठ नागरिक म्हणून आपली आणि आधुनिकतेची तुलना करून आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रा.से.यो.ची स्वयं सेविका कु.मानसी जाधव हिने ” स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत डॉ. डी.के.आहेर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.बी.घोडे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला नायब तहसीलदार विजय बनसोडे ,महसूल विभागाचे रघुनाथ गायकवाड, .राठोड , उपप्राचार्य डॉ.ए.बी.पवार, डॉ.जयमाला चंद्रात्रे महाविद्यातील विविध शाखेचे प्रमुख,सहकारी प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम