द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या संयुक्त कार्यकारिणी संपन्न झाली. स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्षपदावर अनिल घनवट (Anil ghanvat) यांची निवड करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका येथे ३,४,व ५ सप्टेंबर हे तीन दिवस शेतकरी संघटना, व स्वतंत्र भारत पाक्षाची संयुक्त कार्यकारिणी आयोजित करण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली व कार्यकर्त्यांना पुढील आंदोलनाची दिशा देण्यात आली.
शेतकरी संघटनेच्या व स्वतंत्र भारत पक्षाच्या शिरस्त्या प्रमाणे राज्य कार्यकारिणीत बदल करण्यात आले.
शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदावर ललित बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. प्रज्ञताई बापट, युवा आघाडी अध्यक्षपदी सुधीर बिंदू, स्वतंत्र भारत पक्ष्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्ष्याच्या प्रदेशअध्यक्ष पदावर मधुसूदन हरणे यांची निवड करण्यात आली.
राज्यात पुढील वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्ष भाग घेणार आहे. लवकरच जिल्हा व तालुका स्थरावरील पदाधिकाऱ्यांची नुवड करणार असल्याची माहिती घनवट यांनी दिली.
कार्यकरिणीला राज्यभरातून मिथ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा, सिमताई नरोडे, शेतकरी संघटना प. महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनिल चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजने, शरद गद्रे, धनाजी धुमाळ, दत्तात्रय फडतरे, आदी कार्यकर्त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम