स्फोटाने ‘धुळे’ हादरले ; एकाचा होरपळून मृत्यू

0
12

धुळे प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यात विचित्र अपघात घडला असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर केमिकलची वाहतूक करणाऱ्या टँकरला ट्रकने मागून ठोकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात स्फोट झाल्याने संपूर्ण टँकरने पेट घेतला व या दुर्घटनेत टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ दुपारी 4 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशकडून शिरपूरच्या दिशेने केमिकलने भरलेला टँकर जात होता.
यावेळी भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली.

या धडकेत टँकर रस्त्यावरच उलटला. यानंतर टँकरचा स्फोट झाला. टँकरला भीषण आग लागल्यामुळे आगीचे लोळ बाहेर येत होते. या दुर्घटनेत टँकर जळून खाक झाले आहे. टँकरचा चालक टँकरमध्ये अडकल्याने या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचा आवाज आल्याने नागरिक देखील भयभीत झाली असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने यात संपूर्ण टँकर जळून खाक झाला आहे. जवळपास एक तास आग सुरुच होती . घटनास्थळी नागरिकांसह पोलीस प्रशासन दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here