स्नेह अजूनही कायम आहे ; माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; उमराने येथील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संप्पन्न झाला. प्रथम तत्कालीन गुरुजनांचा हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याची सुरवात झाली.

1981-82 मध्ये इ. 10 वीत असलेले विद्यार्थी -विद्यार्थिनी 40 वर्षानंतर एकमेकांना भेटले. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममाण होतांना डोळ्यातील अश्रूही अनेकांना थांबविता आले नाहीत. शाळेसारखाच आज पुन्हा वर्ग भरला होता फरक एवढाच की आठ शिक्षक मेळाव्यात असूनही विद्यार्थ्यांसाठी कोणताही धडा नव्हता व शिक्षकांच्या करड्या शिस्तीची धडकणंही नव्हती.

विध्यार्थी एकमेकांचीं गळाभेट घेत सेल्फी काढत होते. एकमेकांशी हितगुज करतांना शाळेतील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडत होती. भूतकाळात शिरतांना आणि वर्तमानाची त्याची सांगड घालतांना सर्वांनाच सुखानुभूतीचा प्रत्यय येत होता. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यामध्ये साठवून घेत होता.

मेळाव्यात अनेकजण पत्नी, पती, मुले, नातवंडे यासह हजर होते. 45 माजी विद्यार्थी व 8 शिक्षक हजर असल्याने परत एकदा वर्ग भरला असे वाटत होते. जुन्या किश्यांच्या मैफिलीही रंगल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय हिरे यांनी केले तर वर्गमित्र प्रा. डॉ. सतीश ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्गमैत्रिण लता देवरे अध्यक्षस्थानी होती. व्यासपीठावर एम. व्ही. सोनवणे, एस. आर. देवरे, ए. आर. पवार, एन. टी. देवरे, बी. एन. मोरे, जी. डी. पगार मॅडम, सोनवणे मॅडम, मोरे मॅडम हे शिक्षक विराजमान होते.

या प्रसंगी सर्व गुरुजनांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षकांनी आमचे आयुष्य ह्या मेळाव्यामुळे नक्कीच वाढले असून, विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आमच्या ज्ञानदानाचे फलित झाल्याचे आपल्या बोलण्यातून सांगितले. या प्रसंगी प्रत्येकाने 1982नंतर आपल्यातील बदलाचा उहापोह आपल्या सादरीकरणात व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. सतिश ठाकरे, प्रा. आबा देवरे, प्रा. डॉ. रविंद्र देवरे, राजेंद्र देवरे, रामदास पवार, संजय देवरे, धनंजय हिरे पोलीस निरीक्षक विकास देवरे, देवाजी देवरे, निम्बाबाई देवरे, लता देवरे, कल्पना ओत्सवाल, अरुण सोनवणे, पोपट जाधव यांनी केले. आभार प्रा. आबा देवरे यांनी मानलेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here