सौंदाणे-देवळा रस्त्यावर ऊसाचा ट्रक पलटी

0
53

द पॉईंट नाऊ : शनिवार 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सौंदाणे देवळा रस्त्यावरील हॉटेल देश-विदेश जवळील वळणावर चाळीसगाव येथून ऊस भरून वसंत दादा सहकारी साखर कारखाना विठेवाडीकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 17 टी 7300 चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरी जवळ पलटी झाला.

सुदैवाने चालक क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या वळणावर मागील दोन वर्षांपूर्वी बसचा ताबा सुटल्याने बस व रिक्षा चा अपघात होऊन रिक्षा व बस विहिरीत पडून 26 लोक मृत झाल्याचे आठवणी ताज्या झाल्या. अपघाताचे वृत्त समजताच दहिवड तंटामुक्तीचे अध्यक्ष व हॉटेल देश-विदेशचे मालक गणेश देवरे, किरण भारती, बापू आहिराव, संदीप साळुंके, गणेश भारती आदींनी मदत कार्य करून जखमींना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here