द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; किरीट सोमय्या CST वर पोहचल्या नंतर पोलीस व सोमय्या यांच्यात बाचाबाची झाली असून यावेळी दोघे बाजूंनी वातावरण तापल्याचे चिन्ह आहेत. सोम्यांना पोलिसांनी आडवले असून सोमय्या आक्रमक झाले आहेत.
महालक्ष्मी एक्स्प्रेस ने किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सोमय्या आक्रमक झाले असून मला थांबवून दाखवाच मी कोल्हापूर ला जातोय. असे थेट आवाहन उद्धव ठाकरेना दिले आहे.
हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. आज सोमय्या यांना 4 तास पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप सोम्यांनी केला आहे. सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाबंदीची नोरीस दिली आहे. यात सोमय्या यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, जिल्ह्यात येऊ नये असा आदेश देण्यात आला आहे.
वातावरण बिघडू नये यामुळे सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. असे झाल्यास राज्यात पुन्हा सेना भाजपा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत असल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कोल्हापूर दौऱ्या संदर्भात फडणवीस अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम