द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; CSMT स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला , सोमय्यांनी ठाकरेंवर आक्रमक होत हल्ला चढवला आहे. किरीट सोमय्या CSMT स्टेशनवर पोहचल्या नंतर पोलीस व सोमय्या यांच्यात बाचाबाची झाली असून धक्का बुक्की झाल्याची देखील माहिती मिळत आहे. पोलिसांनी आडवल्या नंतर आक्रमक होऊन गुंडगिरी थांबवा म्हणून पोलिसांना सुनावले.
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी मला अटक करायला सांगितले आहे असा आरोप सोमय्यांनी केला.
पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या थांबायला तयार नाहीत, व शेवटी ते महालक्ष्मी एक्स्प्रेस ने कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.
उद्या कोल्हापुरात काय हक्त हे बघणं महत्वाचे आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढल्यानंतर कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. आज सोमय्या यांना 4 तास पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप सोम्यांनी केला आहे. सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस दिली आहे. यात सोमय्या यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रशासनाने केला असून, जिल्ह्यात येऊ नये असा आदेश देण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम