सोमय्यांचा मोर्चा हसन मुश्रीफांकडे ; कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या हात धुवून मागे लागले आहेत. आत्ता पर्यंत महाविकास आघाडी सरकार मधील अनिल देशमुख, अनिल परब असे बडे मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकलेले असतांना, आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर देखील आरोप केले आहेत.
मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या प्रकारे महाविकास आघाडी सरकार मधील अजून एका मंत्र्यांचे घोटाळ्यात नाव पुढे आल्याने महाविकास आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहे. मनी लॉड्रिंग, बेनामी संपत्ती अशा अनेक गोष्टी मुश्रीफ यांच्या कुटुंबयांद्वारे केल्या गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आणि या प्रकरणात आपल्याकडे भक्कम पुरावे आहेत असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. संबंधित पुरावे हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला दिल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.

हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा यांचे सव्वाशे कोटींहून अधिकचे पुरावे आपल्याकडे असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मंत्री हसन मुश्रीफ यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना केंद्र सरकार द्वारे झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. एका मागे एक घोटाळे समोर आणत असल्याने, किरीट सोमय्या यांना ही सुरक्षा देण्यात आल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या अजून किती जणांची नावे उघड करतात, कोणावर काय आरोप करतात? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here