स्वप्निल आहिरे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील अनेक धार्मिक गावांपैकी एक असलेल्या सोमपुर येथे जागृत खंडेराव महाराज मंदिर असून मंदिर जुने झाल्याने त्याचा जिर्णोध्दार करावा असे अनेक दिवसांपासून गावकऱ्यांच्या मनी होते परंतु त्यास मुहूर्त निघत नव्हता परंतु दत्त जयंती व त्यानिमित्त गावी यात्रोत्सव असतो त्याचे औचित्य साधत मंदिर जिर्णोध्दार कामास आमदार दिलीप बोरसे यांनी मोठी देणगी देऊन सुरू करणेसाठी श्रीफळ वाढवून सुरुवात केली.
अनेक वर्षांपासून गावी हे प्राचीन मंदिर असून त्याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. हे मंदिर जागृत असून त्याची प्रचिती अनेक भाविकांना आली आहे.
दिलीप बोरसे यांनी मंदिर जिर्णोध्दार कामास १५११११/- देणगी देण्याचे आवाहन करताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच समाधान मोरे यांनी मूर्ती कामास जेवढा पैसा लागेल तेवढा माझ्या मोरे कुटुंबियांच्या वतीने देणार असल्याचे सांगितले.
यावेळी सरपंच सुनिता गायकवाड, सुभाष भामरे, जगदीश भामरे, गिरीश भामरे, प्रकाश भामरे, तात्याभाऊ बोराळे, पोलिस पाटील विजय नहीरे, दादाजी जाधव, केदा भामरे, भिलाजी भामरे ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे व इतर कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लवकरात लवकर मंदिराचा जिर्णोद्धार करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम