गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली. सध्या लग्नसंमारंभाच्या काळात सोने दिवसेंदिवस महाग होत आहे. लग्नसंमारंभामुळे सोन्याची मागणी जशी वाढली असून सोन्याचा दरही वाढलेला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची वाढ झाली.
रविवारी मुंबईत 1 ग्रॅम सोन्याची किंमच २२ कॅरेट साठी 4,955 आहे तर 24 कॅरेट सोन्यासाठी 5406 आहे. 16 एप्रिलच्या तुलनेत आज सोने काही ठिकाणी स्थिर दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर वाढतच आहे. आठवडयाच्या शेवटी मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांची वाढ झाली आहे. रविवारी सोन्याची किंमत 52,157 रुपये एवढी असून आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीचे दर 69 हजार रुपये प्रति किलो झाले
लगीन सराईच्या काळात सोने महागल्याने सामान्य जनतेला व फटका बसत आहे. काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. येत्या दिवसात सोने महाग होणार, हे निश्चित आहे. देशातील प्रत्येक राज्यात सोन्या-चांदीची किंमत वेगवेगळी असते. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम हा आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर पडला असून, महागाई वाढत आहे. सोन्या, चांदीचे दर देखील वाढले आहेत. येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम