– सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित सोग्रस ते सटाणा रस्त्याचे काम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा समवेत झालेल्या बैठकी नंतर आ.डॉ राहुल आहेर यांनी ‘द पॉईंट नाऊ’ शी बोलतांना दिली.
या बैठकीत मालेगाव सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता देवरे, उपअभियंता , राहुल पाटील, कनिष्ट अभियंता श्री.सपकाळे उपस्थित होते. आमदारांनी आक्रमक होत, लोकांच्या जीवाशी कितीवेळ खेळायचे असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्ती केली.
सोग्रस ते सटाणा या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे, या रस्त्यावर यर जा करतांना अनेक वेळा अपघात झाले तर काहींना शारीरिक व्याधी देखील जडल्याचे निष्पन्न झाले. जीव मुठीत धरून प्रवास या रस्त्याने करावा लागत असे. ‘द पॉईंट नाऊ ‘ ने सतत पाठपुरावा केल्याने लोकप्रतिनिधी सह प्रशासन जागे झाले.
अखेर उद्या (13नोव्हें.) पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर व आमदार राहुल आहेर यांनी रास्ता रोको चा इशारा दिला होता. मात्र लेखी आश्वासन मिळताच भाजपाने आंदोलनातून माघार घेतली होती. महिना उलटला तरी अधिकारी मात्र आश्वासन पूर्तीकडे वाटचाल करतांना दिसत नव्हते. याच मुद्द्याला धरून ‘द पॉईंट नाऊ’ ने अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ‘क्या हुआ तेरा वादा’ या शिर्षकाखालील बातमी तुफान व्हायरल झाली होती. याची दखल घेत आमदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आज तातडीची बैठक घेतली, व त्यातून तोडगा काढण्यात आला आहे.
अनेक वेळा या रस्त्यावर छोटे मोठे अपघात झाले होते. मंगळवारी( दि ९) रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास देवळा -सटाणा राज्यमार्गावरील माळवाडी फाट्यावर खड्डा चुकविण्याच्या नादात देवळ्याच्या दिशेने जात असलेल्या ( एम एच 15 एफ एफ 3659 ) बलेनो या कारला पाठीमागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने मोठे नुकसान झाले होते, देवळा – सटाणा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे . या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याची भावना सर्वसामान्य बोलून दाखवत होते. वाहनधारकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला होता, या मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती . या मागणीला आज यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
काय म्हणाले होते अधिकारी ,लोकप्रतिनिधी
रस्त्याचा सोक्षमोक लावणार – आ.डॉ.आहेर
लेखी आश्वासन देऊन महिला उलटला तरी गेंड्याच्या कातडीचे प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. येत्या दोन दिवसात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग नाही निघाला तर भाजपा आक्रमक होऊन जनतेला न्याय मिळवून देईल, या प्रकरणाचा सोक्षमोक लावणार, आमची बांधिलकी जनतेशी आहे, अधिकारी काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
संबंधितांशी बोलून मार्ग काढतो – प्रशांत सोनवणे (अधीक्षक अभियंता ,PWD)
गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधीनी आंदोलनाचे हत्यार उपसले असता, स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र कामात दिरंगाई झाली असेल तर त्याची चौकशी करून काम लवकर सुरू करू जनतेला त्रास होत आहे हे दुर्दैवी असून कामात दिरंगाई होणार नाही याची खबरदारी घेऊ. येत्या दोन तीन दिवसात काम सुरू होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम