सेवानिवृत्त सैनिकाचे खर्डे गावात जल्लोषात स्वागत

0
44

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; खर्डे ( वा.) ता देवळा येथील रहिवासी संजय दुसाने हे ( दि. ३१) रोजी भारत सरकारच्या केंद्रिय राखीव पोलिस दल ( C.R.P.F.) मधुन सेवानिवृत झाले. या सेवानिवृत सैनिकाचे गावात आगमन झाल्यावर गावकऱ्यांनी सन्मानपूर्वक स्वागत केले .

खर्डे येथे सेवानिवृत्त सैनिक संजय दुसाने यांचे स्वागत प्रसंगी उपस्थित माजी सैनिक दौलतराव भामरे,संदीप देवरे, बापू देवरे, संजय पवार ,प्रवीण दुसाने आदी (छाया – सोमनाथ जगताप )

सेवानिवृत्त सैनिक संजय दुसाने यांचे संपूर्ण बालपण खर्डे ता देवळा ह्या गावी गेले आहे . लहाणपणा पासूनच त्यांना देशसेवा , समाजसेवा , जनसेवा असे गुण त्यांच्या अंगी भिनलेली होती . त्यामूळे नोकरी करायची तर मिलट्री किंवा केंद्रिय पोलिस दलातच असा त्यांनी मनाशी चंग बांधला . त्या दृष्टिने त्यांनी लहानपणा पासूनच उत्तम अभ्यास व मजबूत शरीर , यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली व त्याचा परिपाक म्हणून आपले शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सन २००० मध्ये नागपूर येथे CRPF मध्ये ते भरती झालेत . केरळ येथे ११ महिने खडतर अशी ट्रेनिंग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली .

जम्मू ,काश्मिर, आसाम, त्रिपूरा, मनिपुर , लेह, लद्दाख ,अहमदाबाद व राजस्थान इ. ठिकाणी यशस्वि रित्या आपली सेवा सन्मापूपूर्वक बजावली आहे. जम्मु ,काश्मिर, लेह, लद्दाख अशा भारतीय सीमेवर सेवा बजावत असतांना त्यांनी विविध प्रकारचे खडतर असे प्रसंग अनुभवलेत . यासाठी त्यांनी आपल्या गावापासून , परिवारापासून दूर राहून देशसेवे साठी सर्वस्वि त्याग स्विकारला . आपली ड्यूटि बजावत असतांना त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराची , वयस्कर आई व वडिल , काका, काकु यांची मनस्वी तन – मन- धनाने सेवा केली . याकामी त्यांना त्यांच्या भगिनी श्रीमती अरुणा थोरात , भाचे , वडिल बंधु प्रविण , भावजय मनिषा , पुतणे ,सुविद्य पत्नी धनश्री , कन्या रुतुजा , मुलगा देवांश यांचे सहकार्य लाभले . आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांनी आपल्या गावाची नाळ कधी तोडली नाही . आपल्या गावांतील तरुणांना मिलट्री , पोलीस भरती देशसेवा इ . साठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले . याचेच फळ म्हणूण ते राजस्थान येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर मातृभूमित आगमन झाले . यावेळी त्यांचे उपस्थितीत महिलांनी औक्षण करून स्वागत केले .

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ जगतात , माजी सैनिक दौलतराव भामरे ,संदीप देवरे, ,विस्तार अधिकारी सोमनाथ पवार, प्राथमिक शिक्षक संजय पवार, विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार, संजय अलई , पोलीस पाटील भारत जगताप , भानुदास जगताप , बापू देवरे,शशिकांत पवार, भाऊसाहेब मोरे, पोपट जगताप ,संजय गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, लालू मोरे,प्रवीण दुसाने, रोशन थोरात , बबलू गांगुर्डे ,राजू भामरे, आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here