सुविधांच्या बळकटीकरणासाठी काम करणार ; ना .डॉ. भारती पवार

0
19
जनाशीर्वाद यात्रेप्रसंगी बोलतांना डॉ. भारती पवार समवेत डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, दादा जाधव प्रशांत देवरे आदी (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा प्रतिनिधी;  देवळा तालुका वासीयांनी राजकारणा पलीकडे जाऊन भावना जपल्या , माया दिली यामुळे उमराणे गाव माझे दुसरे माहेर घर समजते . पाणी ,रस्ते व आरोग्य सुविधा अजून बळकट करण्यासाठी मोठे काम उभे करायचे आहे . असे प्रतिपादन नवनियुक्त केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले . उमराणे ता देवळा येथे मंगळवारी (दि १७ ) रोजी  ना . डॉ भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे नागरिकांनी जंगी स्वागत केले. भाजपाचे  जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी प्रास्ताविक केले .

यावेळी ना . पवार यांचा उमराणे ग्रामपंचायत, बाजार समिती, कांदा व्यापारी असोसिएशन, तालुका भाजपा आदींच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. खासदार डॉ. भारतीताई पवार यांच्या रूपाने प्रथमच दिंडोरी लोकसभा मतदार संघास केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जिल्हा भाजपच्या वतीने केदा आहेर यांनी आभार मानले. केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत . त्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यासाठी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी बळ मिळणार आहे . कोरोनाची लाट अजून ओसरली नसून ,नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे ,असे ना पवार यांनी सांगितले.

ना पवार यांच्या हस्ते मुद्रा लाभार्थी , कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ राहुल आहेर , दादा जाधव  आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण ,  जि . प. चे माजी उपाध्यक्ष विश्वास देवरे,  बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, जि . प . चे माजी सदस्य प्रशांत देवरे,संदीप देवरे,प्रमोद देवरे,भिला देवरे,सुनील देवरे,दिशांत देवरे,दिलीप देवरे,भरत देवरे,बंडू देवरे,स्वप्नील देवरे,अभय आहेर,सचिन देवरे,विश्वनाथ देवरे,राहुल देवरे,शिवा देवरे,रामराव देवरे,दर्शन देवरे,अंकुर देवरे,मयूर देवरे,हेमंत देवरे,आबा देवरे,संजय गायकवाड,, नितीन जाधव,सचिन देवरे, अतुल पवार,प्रवीण मेधने ,भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर,अनिल आहेर,रोशन आहेर,अथर्व आहेर,रघु नवरे,बाळासाहेब गुंजाळ ,हर्षद मोरे, दगडू देवरे,बापू जमदाडे,विष्णू सोनवणे, केवळ देवरे,भाऊसाहेब देवरे,समाधान देवरे,किरण देवरे,उत्तम देवरे,प्रभाकर देवरे,दयाराम सावंत, पोपट देवरे,शँकर निकम,किशोर आहेर,दावल भदाणे,हेमंत विसपुते, प्रवीण आहेर,सागर देवरे, संदेश बाफना, दिलीप सोनार,महावीर बाफना, महेंद्र मोदी, रितेश ओस्तवाल, केदा शिरसाठ ,  सरपंच कलमबाई देवरे, बाजार समितीच्या प्रशासक  सोनाली देवरे, वर्धमान लुंकड ,देवानंद वाघ,प्रा सतीश ठाकरे, उपसभापती धर्मा देवरे, भूषण कासलीवाल , माजी सभापती राजेंद्र देवरे, राजेंद्र शिरसाठ आदिंसह उमराणे, देवळा  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनाशीर्वाद यात्रेप्रसंगी बोलतांना डॉ. भारती पवार समवेत डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, दादा जाधव प्रशांत देवरे आदी (छाया – सोमनाथ जगताप)

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here