देवळा प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील अग्रगन्य अशा येथील श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च २०२२ अखेर विक्रमी २ कोटी 33 लाख ४७ हजार इतका निव्वळ नफा झालेला होता . सर्व खर्च , घसारा व तरतुदी वजाजाता संस्थेस १ कोटी ४५ हजार ६५५ एवढा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा , उपाध्यक्ष डॉ जगदिश धामणे व संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा यांनी दिली .
याबाबत अधिक माहिती देतांना अध्यक्ष डॉ रमणलाल सुराणा यांनी सांगितले की , संस्थेचे अधिकृत भागभांडवल २ कोटी ५० लाख असून ,वसूल भागभांडवल रु .२ कोटी ८ लाख ७७ हजार ४०० आहे . संस्थेकडे विविध प्रकारचा रु .१८ कोटी ३२ लाखाचा निधी जमा आहे . संस्थेने नुकताच ठेवींचा ५० कोटींचा टप्पा ओलांडला असून, संस्थेकडे रु . ५० कोटी ३६ लाखाच्या ठेवी जमा आहेत . चालू वर्षी संस्थेच्या कर्जवाटपात ५ कोटी २ ९ लाखाची विक्रमी वाढ झालेली असून एकूण कर्जवाटप रु .२८ कोटी १७ लाख ५५ हजार इतकी असून सी.डी. रेशोत ९ % वाढ होऊन तो ३७.०८ % इतका आहे . नेट एनपीए ० % आहे .संस्थेने विविध बँकांमध्ये व सेंट्रल गर्व्हमेंट सिक्युरीटीमध्ये रु . ४० कोटी ५३ लाखाची गुंतवणूक केलेली आहे .
कोरोनाच्या सावटातून अजून सर्वजण सावरलेले नसतांनाही गत वर्षाच्या तुलनेत थकबाकीमध्ये ०.४४ % इतकी अत्यल्प का होईना घट झालेली आहे . मार्च अखेर संस्थेची निव्वळ थकबाकी २.६६ % इतकी अत्यल्प राखण्यात यश मिळाले आहे . यावेळी संचालक रमेश संकलेचा , प्रदिप सुराणा , हरकचंद ओस्तवाल , ईश्वर सुराणा , धरमचंद संचेती , सुभाष सोनवणे , राजेंद्र सुराणा , डॉ भुषण कर्नावट , जर्नादन शिवदे , संजय कानडे , संचालिका सुशिला सुर्यवंशी , सुरेखा सुराणा आदींसह व्यवस्थापक महेश जोशी व कर्मचारी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम