द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात इंधन दर कमी होण्याची शक्यता आहे. रशियाने दिलेल्या ऑफर नुसार भारतातील कंपनी इंडियन ऑइलने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतातील कंपनी इंडियन ऑइलने रशियाकडून कच्चे तेल 25 ते 30 डॉलरने स्वस्त प्रति बॅरल हिशोबाने विकत घेतले आहे. त्यामुळे भारतात इंधन दर कमी होण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारपेठेत रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रति बॅरल वर जाऊन पोहोचले होते. मात्र आता हे दर देखील 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. त्यामुळे देशात इंधन दर कमी होण्याची दाट शक्यता आहे.
महागाईने हैराण झालेल्या सामान्य जनतेला इंधन दरवाढीने मोठा झटका दिला होता. देशात सध्या इंधनाचे दर 110 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. मात्र आता रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्याचे वृत्त आणि जागतिक बाजारपेठेत खाली आलेले कच्च्या तेलाचे दर यामुळे इंधनाचे दर स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास सामान्य जनतेला हा एक मोठा सुखद धक्का असणार आहे.
याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नसले, तरी या वृत्ताबाबत इंडियन ऑईलने दुजोरा दिल्यास सामान्य नागरिकांना महागाईतून मोठा दिलासाच मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम