
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जगामध्ये फक्त ज्ञान अशी एकमेव गोष्ट आहे की ती दिल्याने वाढते. जेवढे ज्ञान भरभरून देणार तेवढे ते वाढ

त असते. ते देण्याचे काम ज्या शिक्षकांच्या नशिबी आले ते शिक्षक फार भाग्यवान असून, याप्राप्त ऊर्जा इतके दुसरे समाधान माणसाकडे कितीही पैसा असला तरी ते मिळूच शकत नाही.
ही ऊर्जा व समाधान खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव देवरे यांना मिळाले असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी आर पवार यांनी खर्डे येथे केले. मविप्रच्या बेज येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक सुखदेव देवरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सोहळा खर्डे येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षकी पेशात बदली ठरलेली असते .
काही शिक्षक गैरसोयीची बदली झाली तर ज्ञानदानाकडे दुर्लक्ष करतात. शाळेत येणारे विद्यार्थी निष्णात असतात. यात मुलांचा काही दोष नसतो. चांगले शिकवले पाहिले व शिक्षकांनी संघर्षाला सामोरे गेले पाहिजे. सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव देवरे यांनी बादलीच्या संघर्षाला सामोरे जाऊन चांगल्या प्रकारे ज्ञानदान केले आहे. यापुढे त्यांच्या हातून समाजसेवा घडेल. असे पवार सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी आर पवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच नारायण जाधव, माजी सभापती बापू देवरे ,ह. भ .प. सुखानंदजी महाराज, ह .भ. प. पुंडलिक महाराज, ह भ प नामदेव महाराज उपस्थित होते. यावेळी संदीप पवार,बापू देवरे,राजाराम गांगुर्डे, विवेक पवार,कु आराध्या गांगुर्डे, अड .सागर वाकळे, केशव सोनवणे, रुपेश देवरे, डी एम न्याहरकर ,अरुण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केदाबाई देवरे ह .भ. प .नामदेव महाराज,ह. भ .प .सुखानंदजी महाराज, ह. भ. प. पुंडलिक महाराज, शशिकांत ठाकरे, प्रमोद देवरे, रुपेश देवरे, वसंतराव ठाकरे, हरी देवरे, गोसावी सर, संदीप देवरे, डॉ बापू सोनवणे, राकेश गिरासे, स्वप्नील देवरे, नारायण जाधव ,कडू देवरे, संदीप शिंदे, गणेश देवरे, संजय पाटील, सचिन देवरे, भास्कर पवार, बबन गांगुर्डे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन नितीन पवार यांनी तर प्रस्तावित राजेंद्र ठाकरे यांनी केले . आभार रुपेश देवरे यांनी मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम