
सोमनाथ जगताप
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : १ सप्टेंबर पासून सीटू संलग्न असलेल्या नगरपरिषद व संवर्ग कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद पुकारले आहे.

आज याबाबत देवळा येथील नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी संदीप भोळे यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनाचा आशय असा की,शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांचे मयत झाल्यास १० लाखाचे सानुग्रह अनुदानाचा आदेश काढावा, सातव्या वेतनची दोन हप्त्याची रक्कम अदा करावी,सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून द्यावीत ,कंत्राटी कामगारांना किमान वेतना नुसार वेतन देण्यात यावे,बोनस,सानुग्रह अनुदान देण्यात यावे, रिक्त पदे भरावीत, नगरपंचायत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त वेतनासाठी ग्रामपंचायतीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी ,थकीत अनुदानाची रक्कम मिळावी आदी विविध ३२ प्रलंबित मागण्यांसाठी सिटू संलग्न नगरपंचायत ,नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी दि १ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे . अशी माहिती देवळा येथील संघटनेचे सदस्य सुधाकर आहेर यांनी दिली .
देवळ्याचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी अध्यक्ष सुरेश आहेर, दत्तात्रेय बच्छाव, वसंत आहेर आदी कामगार उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम