नाशिक प्रतिनिधी : लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर-वीरच्या सिव्हिलच्या फेऱ्या वाढल्या असून हा चिंतेचा व शंकेचा विषय झाल्याने आज, कोर्टानं गंभीर दखल घेत सिव्हिल हॉस्पिटलला नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली.
झनकर खरोखर इतक्या आजारी आहेत का असे तिखट सवाल कोर्टाने सिव्हिल हॉस्पिटलला केल्याने प्रशासनाची धांदल उडाली तर, झनकर नोटीस बघून एकदम ठणठणीत झाल्याचे बघायला मिळाले.
आज झनकर यांची तातडीनं जिल्हा कारागृहात रवानगी गेली इतर 2 संशयीत ज्ञानेश्वर येवले,पंकज दशपुते यांना 25 हजाराच्या जातमुचलक्यावर कालब जामीन मिळाला आहे.
डॉ झनकर यांच्या जामीन अर्जावर 2 दिवसांनी सुनावणी होणार आहे. यामुळे शिक्षण विभागाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम