सिंहगड परिसरात गुंडांची दहशत, खंडणी मागत दुकानदारावर हल्ला 

0
43

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुंडांनी धुडगूस घातल्याच्या अनेक घटना उघडकीस आले आहेत. सिंहगड परिसरातील नर्हेत गुंड व त्यांच्या साथीदारांनी दुकानदारांना धमकावून परिसरात दहशत माजविली. हल्ला आणि खंडणीचीही मागणी केल्याप्रकरणी पोलीसांनी दोघा गुंडांच्या मुसक्या आवळल्या, इतरांचा शोध सुरू आहे.

सिंहगड परिसरात शनिवारी रात्री गुंडांनी चांगलाच राडा घालत येथील दुकानदारांना धमकावून दहशत माजविली. एका लाँड्री व्यावसायिकाने दुकान बंद न केल्याने त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला इतर व्यावसायिकांना धमकी देत त्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. काही लोकांकडे खंडणीचीही मागणी केली.अनिल भुवड व समिर रानवडे या दोघांच्या तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी रात्री 8 ते 9 या वेळेत या घटना घडल्या आहेत

या टोळक्याने समिर रानवडे यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ केली व त्यांना हाताने मारहाण केली. तक्रारदार तेथे आल्यानंतर आरोपींनी त्याला पकडून ठेवत शिवराजने त्याच्यावर कोयत्याने वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिवराज शिंदे, मन्या उर्फ मनोज चांदणे व निखील इंगळे (रा. नर्हे) अशी अटक केलेल्यांची गुन्हागाराची नावे आहेत. तर त्यांचा एक साथीदार पसार आहे. शिवराज शिंदे व मन्या उर्फ मनोज हे पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here