सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा ; राणे पोलिसांवर भडकले

0
32

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सिधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला, नितेश राणे यांची गाडी सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर पोलिसांनी अडवल्यानंतर निलेश राणे मैदानात उतरून पोलिसांशी त्यांनी हुज्जत घालत का अडवले असा प्रश्न उपस्थित केले.

याठिकाणी काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने तुफान घोषणाबाजी देखील सुरू झाली. भाजप आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आहे. गाडी अडवल्याचे नेमकं कारण समजू शकलेले नाही. दरम्यान यावेळी पोलीस आणि निलेश राणे यांच्याच वाद झाला. कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचे दिसून आले.

काय आहे प्रकरण.…..
शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणात संशयित म्हणून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना जोर का झटका मिळाला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला असून. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. आज कोर्टाने जामीन नाकारल्याचा निर्णय दिला आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड. प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. कोर्टाने जामीन नाकारला असून यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here