सावधान पुन्हा आढळल्या बनावट नोटा ; सुरगाण्यातून संशयित गजाआड

0
35

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नाशिककरांनो जरा नोटा घेतांना सावधान असंन गरजेचे आहे. आज बनावट नोटा चलनात (Fake Note) आणणाऱ्या दोन संशयितांना सुरगाणा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढचा तपास करत आहेत.

6 सप्टेंबर रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील उंबरठाण बाजारात (Umbarthan Market) दोन संशयित वस्तू खरेदी करताना दिसून आले. हरीश वाल्मिक गुजर (वय २९, रा विंचूररोड येवला) व बाबासाहेब भास्कर सैद (वय ३८) रा चिचोंडी खुर्द ता येवला अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी छडा लावण्यासाठी आपली ताकत पणाला लावत आहेत. संशयित दोघांकडेही भारतीय चलनात बंद असलेल्या नोटा मिळून आल्या. त्यांच्याकडे या नोटा कशा आल्या? कुठून त्यांनी या नोटा आणल्या याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

दोघांवर काल रात्री उशिरा सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा (Complaint registered in Surgana Police Station) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून १९ हजार ४०० रुपये रोख यामध्ये १०० रुपयांच्या १९४ नोटा तर ५०० रुपये रोख यासह एकूण २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडखे (API Bodake) अधिक तपास करत आहेत.

दिवसेंदिवस बनावट नोटांची प्रकरणे वाढत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here