सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ ; लाच घेतांना रंगेहाथ ताब्यात

1
36

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लाचखोर अधिकारी पुन्हा एकदा अडकले आहेत. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील (Public works department) उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य लिपिक (Head clerk) आणि वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) महिलेला दहा हजारांची लाच स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

प्रवीण नामदेव पिंगळे व लता शांताराम लहाने-बोडके असे संशयित लाचखोरांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्य लिपिक पिंगळे व महिला वरिष्ठ लिपिक लहाने बोडके यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक पडताळणी, रजेच्या फरकाचे बिल तसेच इतर बिलांचे काम करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

लाचखोरांना पकडण्यासाठी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून लाच मागितल्याची तक्रार केली. यानंतर लाचलुचपत विभागाने ठरल्याप्रमाणे सापळा रचला व कारवाई केली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. लोक म्हणतात सिस्टिम आहे त्याप्रमाणे चालले पाहिजे. भ्रष्ट लोकांना थोडी तरी लाज पाहिजे. ह्यांना कामाचे वेतन मिळते तरी भ्रष्टाचार करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here