सारोळे थडी येथे चंपाषष्टी खंडोबा महाराज उत्सव जल्लोषात संपन्न

0
41

प्रसाद बैरागी
निफाड प्रतिनिधी : निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावी चंपाषष्ठी उत्सव दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्ताने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. या वर्षी देखील सालाबाद प्रमाणे येळकोट येळकोट जयमल्हार जयघोषात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला.

यावर्षीचा मान खंडोबा महाराज भक्त सोमनाथ बेंडकुळे यांना देण्यात आला होता. कोरोना आणि अति वृष्ठी या सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या गावकऱ्यांचा मोठया उत्साहाने कार्यक्रमात सहभाग उल्लेखनीय होता. बारा गाड्या ओढल्यानंतर रात्री खडोबाची तळी भरण्याचा आणि जागरण गोंधळ कार्यक्रम देखिल उत्साहात पार पाडला.यावेळी गावाचे सरपंच श्री आव्हाड यांनी गावावर आलेले संकट टळू दे.अशी प्रार्थना खंडोबा महाराज यांच्या कडे केली . कार्यक्रम उत्साहात संपन्न पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थानी प्रयत्न केले. तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घटि बसलेले श्री सोमनाथ बेंडकुळें यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने माननीय सरपंच यांनी आभार मानले.

चंपाषष्ठी निमित्ताने गेल्या पाच वर्षंपासून अन्नदान म्हणून महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करणारे श्री शिवाजी कीसन भालेराव दत्तात्रय कांगणे, संजय कांगणे यांचाही समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here