प्रवीण आहेर
द पॉइंट नाऊ प्रतिनिधी ; सारथी संस्थेची स्थापना झाल्यापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात आहे. सारथीच्या तारादूतांनी अनेक वेळा आंदोलने करूनही न्याय मिळत नाही. आता साथीचे तारादूत आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. दोन वर्षापासून तात्काळ नियुक्ती मिळावी या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने केलेली प्रत्येक वेळा आश्वासन मिळाले मात्र आश्वासनाची पूर्तता झालीच नाही म्हणून दि. २० ऑक्टोबर पासून तात्काळ नियुक्ती मिळावी या मागणीसाठी सारथी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास करणार असल्याची माहिती निवेदनात दिली आहे.
उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांनी दि. १९ जून रोजी पुणे येथील बैठकीत युवराज छत्रपती संभाजीराजे, मराठा संघटना, तारादूत प्रतिनिधी, सारथी संचालक मंडळ यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आठ मागण्या मान्य केल्या त्यातील एक तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले गेले होते. परंतु आज चार महिने उलटूनही हा प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या काहीच हालचाली दिसत नाही.
प्रकल्प बंद असल्यामुळे सारखी संस्थेच्या योजनांना अनेक वेळा मुदतवाढ देऊनही अपेक्षित लाभार्थी मिळत नाही कारण या योजना ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी तारादूत प्रकल्प काम करत होता. शासनाने कोटी रुपये खर्चून या तारादूतांना प्रशिक्षण दिले होते. प्रकल्पावर स्थगिती म्हटल्यावर सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचतच नाही परिणामी लाभार्थी घटकापर्यंत सारथी पोहोचलेली नाही.
आता तारादूत दि. २० ऑक्टोबर पासून प्रशिक्षित तारादूतांना तात्काळ नियुक्ती मिळावी या मागणीसाठी सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन सारथी कार्यालय पुणे येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम