सारथी ची स्वायत्तता फसवी ; फक्त घोषणांचाच बोलबाला

0
23

प्रविण आहेर
देवळा प्रतिनिधी : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी सारथी संस्थेची स्थापना झाली. १५ ऑक्टोंबर च्या परिपत्रकानुसार सारथी संस्थेला मेमोरेंडम ऑफ असोसिएशन नुसार कार्य करण्यासाठी स्वायत्तता देण्यात आली.

सारथी संस्थेच्या उपक्रमांमध्ये मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी विविध प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये सारथीसंस्थेच्या तारादूत, किसानदूत, महिला सक्षमीकरण, एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग कौशल्य विकास यासारख्या कल्याणकारी उपक्रमाचा समावेश आहे .

या उद्दिष्टांवर कार्य करण्यासाठी १५ ऑक्टोबर नुसार स्वायत्तता आहे. तर मग तारादूत प्रकल्पलासह अन्य योजनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंञालयात कसा पाठवला गेला? दि.१८ जून रोजी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजीराजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी तसेच सारथी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहील तसेच तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते.

आदेश दिले असतांना देखील दि.१४ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तारादूत प्रकल्पाला मान्यता घेणे अपेक्षित होते. परंतु तारादूत प्रकल्पासह अन्य योजनेचा प्रस्ताव नियोजन विभाग, वित्त विभाग आणि हाय पावर कमिटीच्या मान्यतेसाठी मंत्रालयात पाठवण्यात आलेला आहे. प्रत्येक उपक्रमाची मान्यता मंञालयातुन घेण्याची आवश्यकता सारथी संस्थेला पडत असेल तर सारथी संस्थेला दिलेली स्वायत्तता ही फसवी आहे का? महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचा घात करत आहे का यावरून स्पष्ट होत आहे.

त्यामुळे बार्टी संस्थेप्रमाणे सारथी संस्थेला स्वायत्तता देऊन सारथी संस्थेतील स्थगित असलेला तारादूत प्रकल्प तसेच अन्य कौशल्य विकास प्रशिक्षण तात्काळ सुरू करावेत अन्यथा सारथी संस्थेसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा समनव्यक तसेच महाराष्ट्रातील तारादूत करणार असल्याचे सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here