द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नुकताच एस. टी. महामंडळ कर्मचारी संघटनेद्वारे संपाचा इशारा देण्यात आला असतांना, आता प्रवाशांसाठी अजून झटका देणारी बातमी आहे. एस. टी. बस च्या प्रवासासाठी आता प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
इंधन दरवाढीने सध्या सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आणि त्यात एस. टी. महामंडळाला देखील त्याचा मोठा फटका बसला आहे. ज्यात त्यांना सुमारे 1200 कोटींहुन अधिक चा फटका बसलाय. त्याचाच परिपाक म्हणजे एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेतन देखील मोठ्या प्रमाणावर थकले. ज्यामुळे बऱ्याच एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
आता हा तोटा भरून काढण्यासाठी एस. टी. महामंडळ प्रवासाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. याबाबत प्रस्ताव देखील सादर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एस. टी. प्रवासाच्या दरांमध्ये सुमारे 17 टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मांडण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इंधन दरवाढीने आधीच त्रस्त सामान्य नागरिकाला हा अजून मोठा झटका बसू शकतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम